निम्म तुम्ही निम्म आम्ही या म्हणी प्रमाणे केळीची अनुदानाची रक्कम लुटली जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांचा गंभीर लोकशाही दिनामध्ये आरोप

निम्म तुम्ही निम्म आम्ही 
 या म्हणी प्रमाणे  केळीची अनुदानाची रक्कम लुटली जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांचा गंभीर लोकशाही दिनामध्ये  आरोप 


 तहसीलदार शिल्पाताई ठोकळे यांनी फेर तपासणी करण्याची आदेश 

 ज्या शेतकऱ्यांचे खरोखर नुकसान झाले आहे अशा केळी उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही 
 मात्र ज्यांनी आयुष्यात कधी केळी लावली नाही त्यांना केळी नुकसान भरपाई मिळाली
 तलाठ्यांनी खोटे बनावट पंचनामे करून ठराविक लोकांना अनुदानाची रक्कम मिळवून दिली या सर्व प्रकाराची खाते चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी आज लोकशाही दिनाच्या निमित्ताने तहसील कार्यालयात आयोजित बैठकीत केली
 तहसीलदार शिल्पाताई ठोकडे व सर्व खात्याचे खाते प्रमुख यांचे उपस्थितीत तहसील कार्यालयात आज लोकशाही दिनाच्या निमित्ताने सर्वसामान्यांच्या अडीअडचणी व तक्रारी समजावून घेण्यासाठी बैठक बोलवण्यात आली होती 
 या बैठकीत केळी अनुदान व शहरातील अतिक्रमण यावर वादग्रस्त चर्चा झाली 
  मे 2024 मध्ये वादळी वाऱ्यामुळे केळी बागा जागेवर पडल्या होत्या 
 यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले होते 
 याप्रमाणे तालुक्यातील 4733 शेतकऱ्यांना नऊ कोटी 27 लाख रुपयांचे अनुदान वितरित करणे चालू आहे 
 मात्र प्रत्यक्ष अनुदान वाटताना ज्यांनी आयुष्यात केळी लावली नाही त्यांच्या खात्यावर पैसे जमा होत असल्याचे निदर्शनाला आल्यामुळे 
 उमरड तालुका करमाळा येथे केळी उत्पादक शेतकरी व संबंधित एजंट यांच्यात मारामारी झाली
 हा मुद्दा महेश चिवटे यांनी बैठकीत मांडला
 तालुका कृषी कार्यालयाने नुकसानीचा गोषवारा दिला होता 
 मात्र पंचनामा करताना तालुक्यातील काही तलाठ्यांनी शेतकऱ्यांशी व एजन्सी तडजोड करून 
 ज्यांच्या शेतात केळी नाही अशा लोकांची नावे यादीत घातली 
 यामुळे केळी नसताना सुद्धा काही शेतकऱ्यांना लाखो रुपयाचे अनुदान मिळाले आहे
 यासंदर्भात खोटा व बनावट  पंचनामा करण्यासाठी  एजंट मार्फत काही तलाठ्यांची मध्यस्थी करून 25 ते 50% रक्कम  असे ठरवून व्यवहार केले असा आरोप  तहसीलदार शिल्पकार ठोकडे यांच्या समोर केला 
 काही शेतकऱ्यांची केवळ एक गुंठा केळीचे नुकसान झालेले असताना त्याला दोन दोन एकराचा लाभ मिळवून दिला आहे नुकसान झालेले दुसरीकडले फोटो 
 पंचनाम्याला जोडून कागदपत्रात सुद्धा फेरफार   केली असल्यास चर्चा आहे
 ज्या शेतकऱ्यांचे मार्च 24 मध्ये केळी नुकसान झाले आहे व पंचनामा झाल्या नसल्यामुळे त्यांना रक्कम मिळाली नाही अशांनी शिवसेना कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले 
 

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश