छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात दाखल्यांचा वर्षाव

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात दाखल्यांचा वर्षाव



केम,  छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात नागरिकांच्या विविध महसूल संबंधित समस्यांचे निवारण करण्यात आले, तसेच विविध प्रकारचे दाखले त्वरित उपलब्ध करून देण्यात आले.
शिबिरात केम मंडळ अधिकारी यांच्यासह महसूल तलाठी आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. त्यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेत त्यांचे जागेवरच निराकरण करण्याचा प्रयत्न केला.
या शिबिरात नागरिकांना मोठ्या प्रमाणात विविध दाखल्यांचे वितरण करण्यात आले. यात प्रामुख्याने उत्पन्नाचे दाखले, रहिवासी दाखले (डोमिसाइल) यांचा समावेश होता. तसेच, काही नागरिकांना फार्मर आयडी संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले आणि प्रतिज्ञापत्र भरून घेण्यात आले.
याबद्दल नागरिकांमध्ये विशेष उत्साह दिसून आला.
या उपक्रमामुळे नागरिकांच्या वेळेची आणि श्रमाची बचत झाली, अशी प्रतिक्रिया लाभार्थ्यांनी व्यक्त केली. प्रशासनाच्या या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश