श्री मकाई सहकारी कारखान्याचा गळीत हंगाम लवकरच सुरू, ४ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

करमाळा तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम २०२५-२६ चालु करण्याच्या दृष्टीने आज कारखान्याच्या प्रथेप्रमाणे १५ ऑगस्ट २०२५ रोजी कारखान्याचे विद्यमान चेअरमन दिनेश अंबादास भांडवलकर यांचे शुभहस्ते व इतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मिल रोलर पुजनाचा कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला. यावेळी कारखान्याचे संचालक रामचंद्र दगडू हाके, अजित जालींदर झांजुर्णे, रेतन्नाथ देवराव निकत, विलास नेनिनाथ काटे, गणेश अर्जुन तळेकर, गणेश मनोहर झोळ, आशिष ज्ञानेश्वर गायकवाड, कार्यकारी संचालक, सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख, कर्मचारी व कारखान्यावर प्रेम करणारे सर्व हितचिंतक उपस्थित होते.
सुरूवातीला श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, करमाळा तालुक्याचे भाग्यविधाते स्व. दिगंबररावजी बागल (मामा) यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे पुजन जेष्ठ संचालक रामचंद्र दगडू हाके व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले त्यानंतर स्वतंत्र भारताच्या ७९व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त चेअरमन मा. दिनेश भांडवलकर यांचे शुभहस्ते ध्वजारोहन होवून आंतरराष्ट्रीय सहकार दिनाचे औचित्य साधुन कारखान्याचे जे कामगार मयत झालेले आहेत त्यांच्या वारसांना थकीत रकमेचे धनादेश वाटपाचा कार्यक्रम सर्व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. त्याचबरोबर हर घर तिरंगा या राष्ट्रीय अभियानाअंतर्गत प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते तिरंगा वाटपाचा कार्यक्रम पार पडला तसेच कारखाना मुख्य प्रशासकीय कार्यालयासमोर पर्यावरणपुरक वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी बोलताना चेअरमन मा. दिनेश भांडवलकर म्हणाले की, कारखान्याच्या मार्गदर्शिका मा. रश्मी दिगंबरराव बागल, गटाचे नेते मा. दिग्विजय दिगंबरराव बागल व तालुक्याच्या नेत्या मा. शामलताई दिगंबरराव बागल यांच्या मार्गदर्शनाखाली गळीत हंगाम २०२५-२६ चालु करण्याच्या दृष्टीने कारखान्यातील मशिनरी दुरूस्ती व देखभालीची कामे वेगात सुरू असुन ऊस तोडणी/वाहतुक यंत्रणेचे करार करण्याचे काम पूर्ण झाले. गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये कारखाना वेळेत सुरू करण्याचा व्यवस्थापनाचा मानस असुन कारखान्याचे ४ ते ४.५० लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. सदरचे उद्दिष्ट सर्वाच्या सहकार्याने पूर्ण होणार असुन ऊस उत्पादक बांधवानी आपण पिकविलेला सर्व ऊस श्री मकाई कारखान्याकडे गळीतास देवून सहकार्य करावे. कारखाना व्यवस्थापणाने घेतलेल्या निर्णयानुसार सर्व कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन आदा करण्याची कार्यवाही सुरू असुन सर्व कर्मचाऱ्यांनी  पूर्ण योगदान देवून २०२५-२६ चा गळीत हंगाम यशस्विपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन चेअरमन यांनी यावेळी केले.

कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. सुनिल दळवी यांनी सर्वाना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देवून कारखान्याचे अडचणीचे दिवस संपले असुन यापुढील काळ हा सुवर्णकाळ असल्याचे सांगुन कार्यक्रमासाठी उपस्थित राहील्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कामगार कल्याण अधिकारी बरडे यांनी केले.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश