केम-मलवडी रेल्वे भाग पलीकडील अंधार दूर! खासदार मोहिते-पाटील यांच्या प्रयत्नांमुळे २४ तास वीजपुरवठा सुरू

केम-मलवडी  रेल्वे भाग पलीकडील अंधार दूर! खासदार मोहिते-पाटील यांच्या प्रयत्नांमुळे २४ तास वीजपुरवठा सुरू


केम: खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या विशेष प्रयत्नांमुळे केम ते मलवडी रेल्वे लाईनच्या पलीकडील सर्व वाड्या-वस्त्या आणि औद्योगिक वसाहतीला आता २४ तास अखंड वीजपुरवठा मिळणार आहे. यामुळे अनेक वर्षांपासूनची या भागातील विजेची समस्या कायमस्वरूपी मिटली आहे, ज्यामुळे स्थानिक नागरिक आणि  आनंदाचे वातावरण आहे.
​या भागातील लोकांना अनेक वर्षांपासून अपुरा आणि अनियमित वीजपुरवठा मिळत होता. विशेषतः थ्री फेज वीजेच्या अभावामुळे औद्योगिक वसाहतीमधील उद्योगांना मोठा फटका बसत होता. ही गंभीर समस्या खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी गांभीर्याने घेतली. त्यांनी संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला, अनेक बैठका घेतल्या आणि या समस्येवर तोडगा काढण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
​त्यांच्या अथक परिश्रमांमुळे आता या परिसरात सिंगल फेज आणि थ्री फेज दोन्ही प्रकारचा वीजपुरवठा सुरळीत सुरू झाला आहे. यामुळे शेतीपंपांना नियमित वीज मिळेल, घराघरात २४ तास वीज उपलब्ध होईल आणि उद्योगांची कामेही अखंडितपणे सुरू राहतील.
​स्थानिक नागरिक आणि  खासदार मोहिते-पाटील व अजित तळेकर यांच्या या कामाबद्दल त्यांचे आभार मानले आहेत

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश