चिखलठाण जिल्हा परिषद गटातून युवा नेते शंभूराजे जगताप यांना उमेदवारी देण्यात यावी संदीप सरडे
चिखलठाण जिल्हा परिषद गटातून युवा नेते शंभूराजे जगताप यांना उमेदवारी देण्यात यावी संदीप सरडे
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा झाली आहे, तसेच गटनिहाय आरक्षणाची सोडत देखील पार पडली आहे. या पार्श्वभूमीवर, चिखलठाण जि. प. गटातून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि युवा नेते, शंभूराजे जगताप यांना उमेदवारी देण्याची मागणी जोर धरत आहे.
जगताप गटातील कार्यकर्ते, संदीप (बाबुराव) सरडे यांच्या नेतृत्वाखाली, आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी शंभूराजे जगताप यांच्या उमेदवारीची मागणी केली आहे. चिखलठाण जिल्हा परिषद गटामध्ये, देशभक्त कै. नामदेवराव जगताप साहेबांपासून, मा. आ. जयवंतराव जगताप यांच्यासह, तिसऱ्या पिढीतील युवा नेते शंभूराजे जगताप यांना पाठिंबा देणाऱ्या, ज्येष्ठांसह, युवकांचा एक मोठा वर्ग आहे.
संपूर्ण तालुक्यात, शंभूराजे जगताप समाजातील प्रत्येक घटकांच्या समस्या निवारणासाठी नेहमीच तत्पर असतात. जेऊर-कुगाव रस्त्याच्या समस्येवर शंभूराजेंनी जनआंदोलन करत या समस्येचे निराकरण केले. याव्यतिरिक्त, त्यांनी मा. आ. जयवंतराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकास कामांचा पाठपुरावा केला आहे. कोविड महामारीच्या काळात, जेव्हा करमाळा तालुक्याला मदतीची गरज होती, तेव्हा शंभूराजे जगताप यांनी नेहमीच सक्रिय राहून प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडली. नुकतेच, करमाळा तालुक्यात सीना नदीला पूर आला होता, अशा स्थितीतही शंभूराजे कायम तत्पर राहिले.
सामाजिक आणि धाडसी नेतृत्व म्हणून शंभूराजेंची ओळख आहे, आणि ज्येष्ठनागरिक व युवकांसोबत नवीन विचारांचा समन्वय साधत, ते संपूर्ण तालुक्यासाठी एक आदर्श स्थान निर्माण करत आहेत. गोरगरीब जनतेवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध धाडसीने लढणारे नेतृत्व आज या भागात आवश्यक आहे, म्हणूनच युवक आणि ज्येष्ठ नागरिकांकडून शंभूराजे जगताप यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी देण्याची मागणी होत आहे, आणि आम्हाला विश्वास आहे की ते मोठ्या मताधिक्याने निवडून येतील.