इच्छुक उमेदवारांनी विद्यानगर येथील भाजपा कार्यालयात संपर्क साधून भाजप महाराष्ट्र महिला उपाध्यक्ष रश्मी बागल

करमाळा नगरपरिषद निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून निवडणुकी करिता भारतीय जनता पक्षा मार्फत जे उमेदवार इच्छुक आहेत अशा इच्छुक उमेदवारांनी विद्यानगर येथील भाजपा कार्यालयात संपर्क साधून भाजप महाराष्ट्र महिला उपाध्यक्ष रश्मी  बागल


 आपण इच्छुक असल्याबाबतचे विहित नमुन्यातील फॉर्म उद्या आणि परवा म्हणजे दिनांक सहा व सात नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते 5 या वेळेत सादर करावेत असे आवाहन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष व साखर संघाच्या संचालिका रश्मी दिदी बागल यांनी आज येथे केले आहे याबाबत अधिक बोलताना रश्मीदीदी बागल म्हणाल्या की करमाळा नगरपरिषदेची निवडणूक जाहीर झाली असून भारतीय जनता पक्ष संपूर्ण ताकतीनिशी ही निवडणूक लढवणार असून जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी विद्यानगर येथील भाजपा कार्यालयाशी संपर्क करून आपण आपले इच्छुक असल्याबाबतचे विहित नमुन्यातील फॉर्म दिनांक सहा व सात नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते 5 या वेळेत सादर करावे इच्छुक उमेदवारांच्या संदर्भातील निर्णय पक्षपातळीवर वरिष्ठ घेतील करमाळा शहर हे परिवर्तनासाठी सज्ज असून या निवडणुकीमध्ये निश्चितपणे भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळेल असा विश्वास यावेळी रश्मी दीदी बागल यांनी व्यक्त केला आहे.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश