करमाळा तालुक्यातील गावातील ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक यांनी दिव्यांग बांधवांना 5% दिव्यांग निधी वाटप न केल्यास कारवाई करण्यात यावी... ? प्रहार संघटना करमाळा* तालुका अध्यक्ष संदीप तळेकर


करमाळा तालुक्यातील गावातील ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक यांनी दिव्यांग बांधवांना 5% दिव्यांग निधी वाटप न केल्यास कारवाई करण्यात यावी... ? प्रहार संघटना 


करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर यांची मागणी....
करमाळा तालुक्यातील सर्व गावातील ग्रामपंचायत व पंचायत समिती मार्फत सर्व दिव्यांग बांधव यांना 5 % टक्के निधी सन 2024-25 चा निधी वाटप करण्यात यावा यासाठी
 पंचायत समिती  गट विकास अधिकारी करमाळा डॉ,अमित कदम साहेब यांना  करमाळा तालुक्यातील अतंर्गत येणाऱ्या सर्व गावातील ग्रामपंचायत मार्फत दिव्यांग 5 % टक्के निधी वाटप गट वर्ष 2024-25 चा वाटप करण्यात आलेले नाही. तरी सदर निधी 26 जानेवारी दिवशी प्रत्येक ग्रामपंचायत माध्यमातून दिव्यांग बांधवांचा  प्रमाणपत्र देऊन मानसन्मान करावा व ५% निधी वाटप करण्यात यावा, अशी सूचना सर्व गावातील ग्रामसेवक यांना करून दिव्यांग बांधव यांना न्याय मिळवून द्यावा काही गावातील ग्रामसेवक आपल्या गावातील महसूल इतर दिव्यांग ठिकाणी खर्च झाला म्हणून दिव्यांग बांधवांना खोटी माहिती दिली जात आहे. व दिव्यांग बांधवांना थोड्या प्रमाणामध्ये निधी वाटप केला जातो व काही दिव्यांग बांधवांना गावातील ग्रामपंचायत मध्ये दिव्यांग निधी वाटप करत नाहीत. आणि गावातील तक्रारी प्रहार संघटने कडे आहेत यामुळे तालुक्यातील गावातील राजकारणाच्या प्रतिनिधीला व राजकारण करणाऱ्या लोकांना पाठीशी घालणाऱ्या अशा गावातील  ग्रामपंचायती मधील  ग्रामसेवक, सरपंच, यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी .अन्यथा प्रहार स्टाईलने अशा ग्रामसेवकाच्या तोंडाला काळे फासून आंदोलन करण्यात येईल.असे निवेदन करमाळा गट विकास अधिकारी डॉ,अमित कदम साहेब यांना देण्यात आले त्यावेळी उपस्थित प्रहार करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर, प्रहार तालुका उपाध्यक्ष पप्पू ढवळे, दिव्यांग संघटना अध्यक्ष बिभीषण काळे, सामाजिक नेते, मानसिंग खंडागळे, व इतर सर्व दिव्यांग बांधव प्रहार पदाधिकारी,कार्यकर्ते, उपस्थित होते,

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

रश्मी बागल यांच्या नावाची जोरदार चर्चा

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश

केम जिल्हा परिषद गट: भाजपच्या निष्ठवान कार्यकर्त्यांना संधी द्या; सुरेखा संतोष देवकर यांच्या उमेदवारीची मागणी