केम जिल्हा परिषद निवडणूक: 'ओबीसी' आरक्षणावरून राजकीय वातावरण तापले; खऱ्या ओबीसी उमेदवाराला संधी मिळणार का?
केम जिल्हा परिषद निवडणूक: 'ओबीसी' आरक्षणावरून राजकीय वातावरण तापले; खऱ्या ओबीसी उमेदवाराला संधी मिळणार का?
आगामी जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल वाजण्यास सुरुवात झाली असून, केम जिल्हा परिषद गटात ओबीसी आरक्षणावरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यावेळेस राजकीय पक्ष 'खऱ्या' आणि निष्ठावंत ओबीसी कार्यकर्त्याला तिकीट देणार की प्रस्थापितांच्या मर्जीतील उमेदवाराला संधी मिळणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
केम गटात ओबीसी समाजाची मोठी मतदार आहे. गेल्या काही निवडणुकांचा इतिहास पाहता, अनेकदा आरक्षणाचा फायदा घेऊन धनदांडगे किंवा प्रस्थापित नेत्यांचे जवळचे नातेवाईक निवडणुकीच्या रिंगणात उतरतात. मात्र, यावेळी "जो समाजाच्या सुख-दुखात धावून येतो आणि ज्याने वर्षानुवर्षे पक्षाचे काम केले आहे, अशाच खऱ्या ओबीसी चेहऱ्याला तिकीट द्यावे," अशी आग्रही मागणी स्थानिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.