उजनी जलाशयाच्या काठावरील धरणग्रस्त शेतकऱ्यांना भीमा उपसा सिंचन विभाग, भिमानगर यांचे कडून अतिक्रमण केल्याच्या नोटीसेस प्राप्त
उजनी जलाशयाच्या काठावरील धरणग्रस्त शेतकऱ्यांना भीमा उपसा सिंचन विभाग, भिमानगर यांचे कडून अतिक्रमण केल्याच्या नोटीसेस प्राप्त
झाल्याने काठावर वरील शेतकऱ्यांमध्ये खळबळ माजली असून शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर आज उजनी धरण संघर्ष समिती करमाळा तालुका व इंदापूर तालुका यांचे वतीने भिमानगर तालुका माढा येथील भीमा उपसा सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंता सौ सुचिता डुबरे यांच्या कार्यालयात जाऊन समक्ष भेट घेतली. या विषयावर संघर्ष समिती व डुंबरे यांच्यात चर्चा झाली. संघर्ष समितीने सौ डुंबरे यांना उजनी धरणग्रस्तांनी केलेल्या त्यागाची कल्पना दिली. धरणग्रस्त शेतकऱ्यांनी आपली घरे, जमिनी, गावे ,घरे व श्रद्धा राष्ट्रहितासाठी पाण्याखाली गाढल्या. सरकारने नाममात्र मोबदला देऊन धरनग्रस्तांकडून जमिनी घेतल्या. आता कुठेतरी 40-50 वर्षानंतर धरणग्रस्तांनी बँकांकडून कर्ज घेऊन शेतीला पाणीपुरवठा केला आहे. शेकडो एकर जमिनी धरणग्रस्तांनी जलाशयासाठी दिल्या परंतु जलाशय काठावर कुठेतरी पसाभर जमीन राहिले असून त्या जमिनीवर धरणग्रस्त कशीबशी गुजरान करीत आहेत तत्कालीन सरकारने सर्वे करताना काही जमिनी संपादित करून देखील पाण्यात बुडत नाहीत अशा जमिनी धरणग्रस्त शेतकरी जनावरांच्या चाऱ्यासाठी उपयोग करीत आहेत. याच जमिनीवर अतिक्रमण केले असे सरकारचे म्हणणे आहे हे सौ डुंबरे यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी सहानुभूतीने विचार करून अतिक्रमणाची कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचे आश्वासन दिले .
या शिष्टमंडळामध्ये उजनी धरणग्रस्त संघर्ष समिती करमाळा तालुका चे अध्यक्ष प्रा शिवाजीराव बंडगर, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष शहाजीराव देशमुख, आदिनाथ चे माजी संचालक धुळा भाऊ कोकरे, वांगीचे माजी सरपंच विठ्ठल शेळके, ज्यांना नोटीस आली आहे असे शेतकरी संघटनेचे नेते हनुमंत यादव, ढोकरी चे दत्ता टकले,तसेच इंदापूर तालुक्यातून इंदापूरचे माजी उपसभापती अंकुश आप्पा पाडुळे, शेतकरी संघटनेचे निलेश देवकर ,काकासाहेब मांढरे, व इतर उपस्थित होते