करमाळा पंचायत समिती निवडणूक: उमरड गणातून सुनिता संदीप मारकड यांचा उमेदवारी अर्ज दाखल
करमाळा पंचायत समिती निवडणूक: उमरड गणातून सुनिता संदीप मारकड यांचा उमेदवारी अर्ज दाखल
करमाळा (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील राजकीय वातावरण आता चांगलेच तापू लागले असून, पंचायत समिती निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला वेग आला आहे. उमरड गणातून 'करमाळा तालुका विकास आघाडी'च्या अधिकृत उमेदवार म्हणून सुनिता संदीप मारकड यांनी आपला उमेदवारी अर्ज शक्तिप्रदर्शनाने दाखल केला.
तालुक्यातील दिग्गज नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीत हा अर्ज दाखल करण्यात आला. यामुळे उमरड गणात करमाळा तालुका विकास आघाडीने जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र दिसत आहे.
उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी समर्थकांनी मोठा उत्साह दाखवला. यावेळी संदीप मारकड यांच्यासह विकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुनिता मारकड यांच्या उमेदवारीमुळे उमरड गणातील महिला वर्गामध्ये आणि तरुण मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण पाहायला मिळत आहे.
विकासाचा अजेंडा घेऊन मैदानात अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना सुनिता मारकड यांच्या समर्थकांनी सांगितले की, "उमरड गणाचा सर्वांगीण विकास करणे, दर्जेदार रस्ते, पाण्याचा प्रश्न आणि महिलांचे प्रश्न मार्गी लावणे हे आमचे मुख्य ध्येय आहे. करमाळा तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही जनसेवेचा वसा घेतला असून, जनतेचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे."
सुनिता संदीप मारकड. यांच्या उमेदवारीमुळे उमरड गणातील लढत आता लक्षवेधी ठरणार आहे. संदीप मारकड यांचा दांडगा जनसंपर्क आणि विकास आघाडीची ताकद यांच्या जोरावर या निवडणुकीत मोठे परिवर्तन घडेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे