करमाळा पोलिसांचा जेऊरमध्ये दणका; 'ट्रिपल सीट' अन् 'बुलेट'स्वारांचे धाबे दणाणले!

करमाळा पोलिसांचा जेऊरमध्ये दणका; 'ट्रिपल सीट' अन् 'बुलेट'स्वारांचे धाबे दणाणले!
​एकाच दिवसात ४९ वाहनांवर कारवाई; दीड लाखांहून अधिकचा दंड वसूल
करमाळा (प्रतिनिधी):

करमाळा तालुक्यातील जेऊर येथे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध करमाळा पोलिसांनी शुक्रवारी धडक मोहीम राबवली. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP) मॅडम व पोलीस निरीक्षक माने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत एकूण ४९ केसेस करण्यात आल्या असून, १ लाख ५३ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
​गेल्या काही दिवसांपासून जेऊर परिसरात विनापरवाना वाहन चालवणे, फॅन्सी नंबर प्लेट्स आणि सायलेन्सरचा आवाज करून दहशत निर्माण करणाऱ्यांच्या तक्रारी वाढल्या होत्या. याची गंभीर दखल घेत पोलीस प्रशासनाने ही विशेष मोहीम हाती घेतली.
​ट्रिपल सीट: क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवणाऱ्या दुचाकी.
​विदाऊट नंबर प्लेट व फॅन्सी प्लेट: कायद्यानुसार नसलेल्या नंबर प्लेट्स.
​बुलेट सायलेन्सर: कर्णकर्कश आवाज करून शांतता भंग करणारे सायलेन्सर.
​विदाऊट लायसन्स: परवाना नसताना वाहन चालवणारे चालक.
​कारवाईत यांचा होता सहभाग:
​ही धडक कारवाई पोलीस हवालदार हिंगमिरे, पोलीस कॉन्स्टेबल राऊत, कांबळे, कदम तसेच निर्भया पथकाने मिळून यशस्वी केली. भरचौकात झालेल्या या कारवाईमुळे बेशिस्त वाहनधारकांची मोठी पळापळ झाली.
​"वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. अपघातांना निमंत्रण देणाऱ्या आणि शांतता भंग करणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध यापुढेही अशीच कडक कारवाई सुरू राहील. नागरिकांनी नियमांचे पालन करून सहकार्य करावे.

या कारवाईमुळे जेऊर परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, बेशिस्त वाहनचालकांना करमाळा पोलिसांनी चांगलाच चपराक लगावली आहे.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

रश्मी बागल यांच्या नावाची जोरदार चर्चा

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश

केम जिल्हा परिषद गट: भाजपच्या निष्ठवान कार्यकर्त्यांना संधी द्या; सुरेखा संतोष देवकर यांच्या उमेदवारीची मागणी