प्रा.रामदास झोळ सर यांच्या नेतृत्वात आवाटी,मांजरगाव,राजुरी येथील कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश

प्रा.रामदास झोळ सर यांच्या नेतृत्वात आवाटी,मांजरगाव,राजुरी येथील कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश

बोराटवाडी ता. मान जि.सातारा येथे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री श्री.जयकुमार गोरे साहेब यांच्या हस्ते करमाळा तालुक्यातील आवाटी,मांजरगाव,राजुरी येथील कार्यकर्त्यांचा प्रा.रामदास झोळ सर यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला. यामध्ये आवाटी गावचे  बाबू मुलानी,रफिक खान,मुजीब पटेल, कदिर पटेल,सोहेल पठाण अनिस सय्यद तसेच मांजरगाव येथील कल्याण मोरे (माजी सरपंच) रामहरी मोरे, किशोर मोरे,सचिन पाटील,सोमनाथ गरदडे, प्रभाकर मोरे तसेच राजुरी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश जाधव, जालिंदर पाटील इत्यादींनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. या प्रवेशावेळी दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भाजपा नेते प्रा.रामदास झोळ सर,आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक नवनाथ बापू झोळ,शेलगाव चे माजी सरपंच रायचंद खाडे, गणेश जाधव, महावीर एकाड,बापू वाडेकर,संदीप सरडे, गोपीनाथ पाटील, संजय जगताप,ज्ञानेश्वर शिंदे,हर्षद आढाव इत्यादी उपस्थित होते.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

रश्मी बागल यांच्या नावाची जोरदार चर्चा

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश

केम जिल्हा परिषद गट: भाजपच्या निष्ठवान कार्यकर्त्यांना संधी द्या; सुरेखा संतोष देवकर यांच्या उमेदवारीची मागणी