करमाळ्यात मुख्य जलवाहिनी फुटली; हजारो लिटर पाणी वाया, शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता
करमाळ्यात मुख्य जलवाहिनी फुटली; हजारो लिटर पाणी वाया, शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता
करमाळा | प्रतिनिधी
करमाळा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीचे एअर वॉल्व अचानक फुटल्याने हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेल्याची घटना आज घडली. यामुळे परिसरात पाण्याचे पाट वाहू लागले असून, ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पिण्याचे पाणी वाया गेल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाइपलाईनवरील एअर वॉल्ववर पाण्याचा दाब वाढल्याने किंवा तांत्रिक बिघाडामुळे तो अचानक फुटला. वॉल्व फुटताच पाण्याचे उंच कारंजे उडू लागले. बघता बघता हे पाणी मुख्य रस्त्यावर आणि शेजारील परिसरात पसरले. बराच वेळ हा प्रकार सुरू असल्याने हजारो लिटर शुद्ध पाण्याचा अपव्यय झाला.