केम ते सोलापूर एसटी बस प्रवाशांसाठी ठरत आहे सोयीची

केम ते सोलापूर एसटी बस प्रवाशांसाठी ठरत आहे सोयीची

केम ते सोलापूर दरम्यान सुरू करण्यात आलेली एसटी बस सेवा सध्या प्रवाशांसाठी अत्यंत सोयीची ठरत आहे. या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करत असून, विशेषतः विद्यार्थी, कामगार आणि व्यावसायिक यांना या सेवेमुळे मोठा दिलासा मिळत आहे.
पूर्वी या मार्गावर प्रवासासाठी खासगी वाहनांवर किंवा बदल्या करीत प्रवास करावा लागत होता. त्यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाढत होते. मात्र, एसटी बस सेवा नियमित झाल्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचत असून प्रवास अधिक सुरक्षित आणि किफायतशीर झाला आहे.

बसच्या वेळापत्रकानुसार सकाळी ६:३० वाजता केम वरून प्रस्थान होऊन उपळवटे दहिवली, कन्हेरगांव, टेंभुर्णी (सकाळी ७:३० प्रस्थान), वरवडे, अरण, मोडनिंब, शेटफळ, मोहोळ , वडवळ मार्गे सोलापूरला सकळी ९:३० ला पोहचते. सर्व थांबे घेणा-या या बस मुळे विद्यार्थी,

नोकरदार, खेळाडू, भाविक, परीक्षार्थी तसेच रुग्णांसाठी अत्यंत सोयीची असल्याने या रुटवरील गाव खेड्यातील प्रवाशांची मोठी सोय झाली आहे. टेंभुर्णी मधून या गाडी नंतर येणाऱ्या सर्व बस लांब पल्ल्याच्या असल्याने त्या सर्व प्रवाशांनी भरलेल्या असतात त्यामुळे टेंभुर्णी व या रुटवरील प्रवाशांना सोलापूर पर्यंत उभा राहून प्रवास करावा लागतो. ही एकमेव गाडी आहे जी या रुटवरील प्रवाशांना अतिशय सोयीची आहे. या गाडी मुळे ग्रामीण भागातील नागरिकांना सोलापूर शहराशी थेट

प्रवाशांकडून या सेवेबाबत समाधान व्यक्त केले जात असून, ही बस सेवा कायम स्वरुपी चालू ठेवण्याची मागणी होत आहे. एसटी महामंडळाने प्रवाशांच्या प्रतिसादाची दखल घेत सेवा अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कुर्दुवाडी आगार प्रमुख श्री रत्नाकर लाड यांनी आवाहन केले की ही गाडी गावखेड्यातील प्रवाशांना अत्यंत सोयीची असल्याने या गाडीचा लाभ घ्यावा

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

रश्मी बागल यांच्या नावाची जोरदार चर्चा

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश

केम जिल्हा परिषद गट: भाजपच्या निष्ठवान कार्यकर्त्यांना संधी द्या; सुरेखा संतोष देवकर यांच्या उमेदवारीची मागणी