जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, निंभोरे येथे पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची चालू वर्षाची घरपट्टी भरणार - सरपंच रविंद्र वळेकर

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, निंभोरे येथे पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची चालू वर्षाची घरपट्टी भरणार   - सरपंच रविंद्र वळेकर
     

निंभोरे येथे पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत ट्रॅक्टर मध्ये बसवून, पूर्ण गावात मिरवणूक काढून करण्यात आले.यावेळी हलगीच्या ताफयात सर्व गावकरी, विद्यार्थी, शिक्षक, गावातील पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ सहभागी झाले होते.
          गावातील जिल्हा परिषद शाळा, वस्ती शाळा येथे जे विद्यार्थी प्रवेश घेतील, अशा विद्यार्थ्यांच्या पालकांची चालू वर्षाची घरपट्टी सरपंच रविंद्र वळेकर भरणारा आहेत. जिल्हा परिषद शाळा वाचवणे काळाची गरज आहे. ती गरज ओळखून सरपंच रविंद्र वळेकर यांनी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत पालक वर्गातून होत आहे.
           यावेळी शाळेतील सहशिक्षिका श्रीमती सानप मॅडम यांची केंद्रप्रमुख म्हणून निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायत निंभोरे व ग्रामस्थ यांचे वतीने सन्मान करण्यात आला.
           तसेच विद्यार्थ्यांना पुस्तके, गुलाबाचे फुल व खाऊ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
     यावेळी सरपंच रविदादा वळेकर, शालेय समितीचे अध्यक्ष, महादेव वळेकर, पंजाब गाडे,प्रविण वळेकर, लालू कळसाईत, भिमराव काळदाते, कुंडलिक काळदाते,गणेश सलगर, अशोक अण्णा जगताप, पांडुरंग दळवे, श्रीराम काळे सर,संतोष जगताप,अक्षय वळेकर, नाथाभाऊ शिंदे, संजय माळी,नंदू जगताप, भालचंद्र गुरव, सोमा गुरव, जहांगीर शेख, नितीन गायकवाड, भोलेनाथ गवळी, शालेय समितीचे सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

रश्मी बागल यांच्या नावाची जोरदार चर्चा

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश

केम जिल्हा परिषद गट: भाजपच्या निष्ठवान कार्यकर्त्यांना संधी द्या; सुरेखा संतोष देवकर यांच्या उमेदवारीची मागणी