दिल्लीत भाजपचे सरकार,करमाळा भाजपाकडून जोरदार जल्लोष
![चित्र](https://lh3.googleusercontent.com/-Fa34PgDfF34/Z6c2nClk2nI/AAAAAAAAECM/zXtTVfjsBCk6dbx3byoHkzgPjraluqSzgCNcBGAsYHQ/s1600/1739011735814339-0.png)
दिल्लीत भाजपचे सरकार,करमाळा भाजपाकडून जोरदार जल्लोष करमाळा:- प्रतिनिधी हर्षवर्धन गाडे भारतीय जनता पार्टीचे सरकार दिल्ली येथे बहुमतामध्ये स्थापन होताच करमाळा भाजपाकडून जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या नेतृत्वामध्ये कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला. गायकवाड चौक करमाळा येथील भाजपा संपर्क कार्यालयासमोर भारत माता की जय,भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणा देऊन परिसर दुमदुमून काढला व फटाक्यांची प्रचंड आतिषबाजी केली.यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे म्हणाले की आता दिल्लीत भाजपचे सरकार एकहाती बहुमतातने आले आहे.केंद्रातही भाजपाचे सरकार आहे. सामान्य जनतेने केंद्र सरकारच्या कारभारवर, विकासकामावर व एकूणच ध्येयधोरणावर विश्वास टाकल्याने दिल्लीमध्ये भाजपचे सरकार आले.दिल्ली ही देशाची राजधानी असल्याने तिथे भाजपची सत्ता येणे गरजेचे होते.दिल्लीत सरकार आल्यामुळे तेथील जनतेला आता याचा मोठा लाभ होणार असून जागतिक पातळीवर दिल्लीचे महत्व माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली भविष्यात वाढणार आहे.भाजपच्या या विकासाला चालना देणाऱ्या व देश विकासाच्या गतीने पुढे ...